खेडला आता अत्याधुनिक डिजिटल सेवा
या केंद्रातून पॅनकार्ड, पासपोर्ट, लाईट बिल भरणा, मतदार नाव नोंदणी, मनी ट्रान्सफर, इन्कम टॅक्सची कामे, एलआयसी हप्ता भरणा, रेल्वे तिकीट बुकिंग आदी सुविधा अल्प दरात उपलब्ध होणार आहेत.
ग्रामीण भागात अधिकाधिक डिजिटल सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी हा प्रयत्न आहे. पुणे जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले खेड हे मोठ्याबाजारपेठेचे गाव आहे. औटेवाडी, गणेशवाडी, वायसेवाडी, आखोणी, शिंपोरा आदी भागातील ग्रामस्थ येथे विविध कामासाठी येतात. त्यांच्यासाठी अल्पदरात विविध ऑनलाईन तसेच इतर कामे पूर्ण होत असल्याने लोकांचा वेळ व पैशाची बचत होणार आहे.