Breaking News

सोशल मीडियावरील व्हायरल क्लीपमुळे शिवसेना पदाधिकारी अस्वस्थ


शिवसेना जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले, जि. प. सदस्य काशीनाथ दाते व नांदुर पठार गावचे सरपंच रविंद्र राजदेव यांच्या राजकिय स्पोटक वक्तव्यांमुळे सध्या पारनेर तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे. मागील काही दिवसांपासून पारनेर तालुक्यातील शिवसेना राजकिय बॉम्ब फोडत आहे. त्यामुळे तालुक्यात कट्टर शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. पारनेरचे आमदार यांच्या अभिष्ठचिंतन सोहळ्याला पक्षप्रमुख उध्दव ठाकरे पारनेर दौर्‍यावर येऊन गेले. त्या कार्यक्रमात माजी शिवसेना तालुका प्रमुख निलेश लंके समर्थकांनी पक्षप्रमुखांच्या समक्ष काही गोष्टी झाल्या. तेंव्हापासुनच शिवसेनेत राजकीय कलगी तुरा पहावयास मिळाला. याच मुद्यावर शिवसेना तालुका प्रमुख निलेश लंकेची पदावरुन हाकलपट्टीची झालेली घोषणा तसेच नवनियुक्त तालुका प्रमुख आमदार औटी समर्थक विकास रोहकले यांची निवड यांमुळे तालुक्यात शिवसेनेचे राजकिय ध्रुवीकरण चांगलेच पहावयास मिळत आहे. त्यातच भर पडली ती पारनेर शहरातील चौकात निलेश लंकेच्या वाढदिवसानिमित्त लावलेला प्लेक्स अज्ञात इसमाने फाडून टाकल्याने लंके व औटी यांच्यात राजकिय दरी वाढत गेली. त्यातच भर पडली ती एका सोशल मीडियावर चांगलीच राजकिय वक्तव्य केल्याने शिवसेना तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे. शिवसेना जिल्हाउपप्रमुख रामदास भोसले, जि. प. सदस्य काशीनाथ दाते तसेच नांदुर पठारचे सरपंच रविंद्र राजदेव यांच्यातील गटात कामे किती केली? या विषयावरुन सगळे रामायण सध्या तालुक्यात चर्चेचा विषय सोशल मीडिया वर धुमाकुळ घालत आहे.