कर्जतला अत्याधुनिक आरोग्य सेवा मिळणार
कर्जत येथे आता माफक दरात सर्वोत्तम, अत्याधुनिक सेवा उपलब्ध होत आहेत. राऊत मल्टीस्पेशालिटीच्या माध्यमातून मेडिकल डायरेक्टर डॉ. रविंद्र राऊत यांनी हा उपक्रम राबविला आहे. कर्जत शहरात अत्याधुनिक वातानुकूलित अतिदक्षता विभाग, स्त्रीरोग-प्रसुती विभाग, अॅक्सिडेंटल तसेच तालुक्यातील पहिला अत्याधुनिक डायलिसिस विभाग, डिजिटल एक्सरे आदी सुविधा उपलब्ध होणार आहेत.
तालुक्यातील आरोग्य सुविधांमध्ये कमतरता असल्याने रुग्णांना दुरवर जावे लागत होते. यामध्ये वेळ व पैसा खर्च होत असल्याने गोर-गरीब जनतेला यातून मोठा दिलासा मिळणार आहे. या उपक्रमाचा लोकार्पण सोहळा रविवारी (दि. 18) सायंकाळी होत आहे. जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली भामाबाई राऊत व चंद्रकांत राऊत यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. खा. दिलीप गांधी, सदाशिव लोखंडे, आ. शिवाजी कर्डिले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा होत आहे.कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. रविंद्र राऊत यांनी केले आहे.