सदगुरू किसनबाबा चौरे पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन
प. पु. आत्मज्ञानी गणपत बाबा चौरे यांनी स्थापन केलेल्या सत्य अविनाश पारख पद समाजाचे ज्येष्ठ गुरुपुत्र ब्रहनिष्ठ सद्गुरू हरिदास बाबा यांचे पुत्र सद्गुरू किसन बाबा चौरे यांचा पुण्यतिथी सोहळा ंआज रोजी पारनेर येथील आत्मज्ञानी गणपत बाबा मठावर संपन्न होत आहे.
सकाळी 11 वा. शिष्य सांप्रदायाचा आध्यात्मिक चर्चात्मक सत्संग होईल. त्यानंतर दुपारी 3 वा. सद्गुरू मूर्तीची मिरवणूक होईल. या वेळी सद्गुरू पादुका पूजन होऊन महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. रात्री 9 ते पहाटेपर्यंत महाराष्ट्रातील नामवंत भेदीक शाहिरांचा आध्यात्मिक भजनांचा कार्यक्रम होणार आहे.
तालुक्यातील इंग्रज कालीण, क्रांतीकारी विचार सरणीतील, अध्यात्मातील गाढे अभ्यासक, ज्यांनी वडगाव सावताळच्या जंगलात तपश्चर्या करून दत्त सावताळ प्रसन्न करून घेऊन आपल्या लेखणीतून सरस्वतीचे दर्शन गद्य व पद्य रुपाने अध्यात्म साहित्याचे लिखाण करून व अध्यात्माचा सार सोप्या शब्दात सर्व सामान्यांना समजेल अशा प्रकारे अध्यात्म साहित्य रचना करत ढोलकी, डफ, तुणतुन्याच्या माध्यमातून पारंपारिक भेदीक भजणांच्या माध्यमातून उतरविणारे थोर संत आत्मज्ञानी गणपतबाबा चौरे यांचे ज्येष्ठ नातू, प. पु. सद्गुरू किसनबाबा चौरे, आत्मज्ञानी गणपत बाबांनी समाज उद्धाराच्या दृष्टिने स्थापन केलेल्या श्री. सत्य अविनाश पारख पद समाज, या समाजाचे शिष्य मंडळ संपूर्ण महाराष्ट्रभर अंधश्रद्धा निर्मुलन, समाज प्रबोधन करत अध्यात्माचा पसार व प्रचाराचे कार्य करत आले आहे.
आत्मज्ञानी गणपत बाबांचे ज्येष्ठ पुत्र ब्रम्हनिष्ठ हरिदास महाराज यांनीही मोठी अध्यात्म साहित्य निर्मिती करत पारख पद आरसा सारखा महान ग्रंथ लिहून हा मार्ग जोपासला. त्यांच्या नंतर प. पु. सद्गुरू किसन बाबांनी ही धुरा अखंडीत सांभाळत मोठे शिष्य मंडळ तयार केले. या धार्मिक सोहळ्यामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यातून आलेल्या शिष्य मंडळ, गुरू बंधुसाठी, दुपारी 12 ते 2 वा. पारखपदी सत्संगाचे आयोजन करण्यात आले असून, दुपारी 2 ते 6 वाजे पर्यंत पारनेरच्या बाजार पेठेतून सवाद्य सद्गुरु प्रतिमेची भव्य मिरवणूक होणार आहे. सायं. प्रतिमेचे पूजन होऊन, संध्या 7 ते 8 या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे. रात्री 8 ते सकाळपर्यंत महाराष्ट्रातुन आलेल्या नामवंत शाहीर मंडळांचा पारंपारीक कलगी तुर्याचा शाहीरी भेदीक भजणांचा कार्यक्रम होणार आहे.
कार्यक्रमासाठी अहमदनगर, पुणे, कोल्हापूर सोलापूर आदी ठिकाणांहून नामांकित शाहीर व पारखपदी भक्तगण हजेरी लावत असतात. या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन अविनाश पारख, बबन चौरे व निजाम शेख यांनी केले आहे.