पोहायला गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू
कोल्हापूर - हातकणंगले येथे विहिरीमध्ये पोहायला गेलेल्या 2 शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. अफान साहेबलाल सय्यद व आमीन हमीद मुजावर अशी मृत मुलांची नावे आहेत.
हे दोघेही हातकणंगले येथील आश्रम शाळेतील इयत्ता सहावीमध्ये शिकत होते. शाळा सुटल्यानंतर दोघांनीही विहीरीमध्ये पोहोण्यासाठी जाण्याचे ठरवले. ठरवल्याप्रमाणे ते शेतात गेले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडू लागले. तेथील अन्य नागरिकांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यांना विहिरीतून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते.