Breaking News

राष्टवादी काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीवर डॉ. जगधने


श्रीरामपूर ता. प्रतिनिधी - येथील डॉ. रविंद्र जगधने यांची राष्टवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी निवड करण्यस्त आली. साखर कामगार हाँस्पिटलचे मेडिकल डाँयरेक्टर डॉ. जगधने यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीवर निवड करण्यात आल्याबद्द्दल राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाचे निरीक्षक संपत नेमाणे, प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, नगरध्यक्षा अनुराधा आदिक आदींनी डॉ. जगधने यांच्या नावाची शिफारस केली होती. यावेळी कृषकचे अध्यक्ष कारभारी बडाख, महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा अर्चना पानसरे, तालुकाध्यक्षा योगेश्वरी उंडे, रेश्मा गुलदगड, गणेश ठाणगे, आकाश क्षीरसागर, सोहेल शेख, विजय शिंदे, मल्लू शिंदे, लकी सेठी, केतन खोरे, राजेंद्र पवार, सुनिल थोरात, भाऊ डाकले आदी उपस्थित होते.