Breaking News

पदवीसह सामाजिक बांधिलकीचे भान हवे : डॉ. गमे


कोपरगाव ता. प्रतिनिधी - पदवी मिळविणे सोपे आहे. पण पदवी मिळाल्यानंतर पदवीप्रमाणे आचरण ठेवणे खूप अवघड आहे. पदवी प्राप्त झाल्यानंतर आपण या समाजाचे काही तरी देणे लागतो, ही भावना प्रत्येक पदवी प्राप्त विद्यार्थ्यांनी मनी बाळगून प्रत्येकाने पदवीसोबत सामाजिक बांधिलकीचे भान ठेवावे, असे प्रतिपादन येवला येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे व कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पदवीग्रहण समारंभ कार्यक्रमात स्नातकांच्या दिक्षांत भाषणप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, युवा नेते आशुतोष काळे होते. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष छबुराव आव्हाड, प्राचार्या डॉ. विजया गुरसळ, प्रा. पी. बी. मोरे आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयाच्या स्नातकांना पदवी प्रमाण पत्राचे वितरण करण्यात आले.