Breaking News

सर्वधर्मिय समाजबांधवांनी शिवजयंती केली उत्साहात साजरी


राहाता प्रतिनिधी - शहरातील सर्वधर्मिय समाज बांधवांनी एकत्र येत शिवजयंती मोठया उत्साहात साजरी केली. विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम, आदिवासी नृत्य या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण होते. डि.जे. च्या तालावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध गाण्यांवर तरूणांनी ठेका धरला. शिवजयंतीनिमित्त राहता शहर भगवेमय झाले होते. 

माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ यांच्या मार्गदर्शनाखाली या शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले. सकाळी विरभद्र मंदिरासमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी शहरातील नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. सायंकाळी ६ वाजता राहाता बसस्टँड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भव्य अशा रथावर ठेऊन तिचे पूजन करण्यात आले. यावेळी गणेश कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव सदाफळ, नगरसेवक सलिम शहा, नगरसेविका सविता सदाफळ, साहेबराव निधाने, चंद्रभान मेहेत्रे, सुनिता टाक, अंजली सदाफळ, गणेश निकाळे, प्रदिप बनसोडे, गणेश बोरकर, प्रशांत दंडवते, शशिकांत लोळगे, दत्ता सदाफळ, स्वप्निल गाडेकर आदींसह शिवप्रेमी नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे यांनी शिवसेनेच्यावतीने येथील शिवाजी चौकात छ्त्रपतीँच्या शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्याचप्रमाणे म. न .से. आणि बिरोबा महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने शिवाजी चौकात रामनाथ सदाफळ, विजय मोगले, सुधाकर वाघमारे, सुरेश बनकर आदींनी शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन केले.