Breaking News

काळे एज्युकेशन सोसायटीची सभा उत्साहात


येथील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीची ४६ वी वार्षिक सर्व साधारण सभा नुकतीच पाझर पडली. संस्थेचे विश्वस्त युवा नेते आशुतोष काळे अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी या एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक स्व. शंकरराव काळे साहेब आणि स्व. सुशीलामाई काळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. संस्थचे सभासद एम. टी. रोहमारे यांनी दिवंगत झालेले सभासद मान्यवर, हितचिंतक, कर्मचारी यांच्या श्रद्धांजलीचा ठराव मांडला. 

यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष आणि संस्थेचे विश्वस्त युवा नेते आशुतोष काळे म्हणाले, या संस्थेचे संस्थापक माजी खासदार स्व. शंकरराव काळे यांनी दूरदृष्टीकोन ठेवून ४७ वर्षापूर्वी ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांना आणि शेतक-यांच्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे, या उदात्त हेतूने ही संस्था सुरु केली. या संस्थेमधून विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्याचे काम अविरतपणे सुरु आहे. गौतम पब्लिक स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेला येत्या काही वर्षात ५० वर्ष पूर्ण होत आहे. ही संस्था सुवर्ण महोत्सवाकडे यशस्वीपणे वाटचाल करीत असतांना सध्याच्या युगात अँग्रीकल्चर व फार्मसी या क्षेत्रात नोक-या मिळत आहेत. 

यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन छबुराव आव्हाड, सचिव चैताली काळे, बाळासाहेब बाराहाते, कारभारी जाधव, सिकंदर पटेल, भास्करराव आवारे, चांगदेव आगवन, अक्षय काळे आदींसह सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक व सभासद, मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन केशव दळवी यांनी केले. सिकंदर पटेल यांनी आभार मानले.