Breaking News

‘प्रवरा’चा अनाथ मुलांसाठी सामाजिक उपक्रम


प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सर विश्वेश्वरय्या इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजी (अभियांत्रिकी ) महाविद्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्यावतीने बुधवारी {दि. २८} ‘अंकुर... एक नवी सुरुवात’ हा सामाजिक उपक्रम घेण्यात आला आहे, अशी माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख प्रा. आर. एस. भालेराव यांनी दिली.

सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून या महाविद्यालयामधील शिक्षक आणि विद्यार्थी दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम राबवित असतात. याचाच एक भाग म्हणून यावर्षी श्रीक्षेत्र त्रिंबकेश्वर येथील अधरतीर्थ आधाराश्रम या संस्थेतील अनाथ मुलांसाठी हा सामाजिक उपक्रम राबविणार आहे. यामध्ये अनाथ मुलांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यांना महाविद्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्यावतीने मदत केली जाणार आहे.