Breaking News

शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने घेतली शिक्षणमंत्र्यांची भेट


अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने एमएससीआयटी रक्कम वसुली स्थगिती व मुदतवाढ देण्याबाबत शालेय शिक्षणमंत्री ना. विनोद तावडे यांची विधानभवन येथे भेट घेवून या प्रश्‍नी चर्चा करण्यात आली. शिक्षक परिषदेच्या पाठपुराव्याने हा प्रश्‍न देखील लवकरच सुटणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी दिली.

यावेळी शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष वेणूनाथ कडू, शिक्षक आमदार नागो गणार, आमदार संजय केळकर, शिक्षक परिषदचे प्राथमिक विभग राजाध्यक्ष राजेश सुर्वे आदि उपस्थित होते. यांनी शिक्षणमंत्री तावडे व शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव श्री नंदकुमार यांच्याशी एमएससीआयटी रक्कम वसुली स्थगिती व मुदतवाढ देण्याची मागणी करुन निवेदन दिले. शिक्षण मंत्री तावडे यांनी एमएससीआयटी रक्कम वसुलीला तत्काळ स्थगिती देणे व ज्यांचे सदर कोर्स करणे बाकी आहे त्यांच्या साठी एक वर्ष मुदतवाढ देण्यासाठी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागास शिफारस पत्र देण्याबाबत सूचना केल्या. या प्रश्‍नी लवकरच सरकार दरबारी सर्व शिक्षकांना दिलासा दायक निर्णय होणार असल्याचे आश्‍वासन त्यांनी शिष्टमंडळास दिले आहे.