Breaking News

जय आनंद फौंडेशन तर्फे स्नेहालयास भेट

नगर- सतत वेगळेपणा जोपासत विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या जय आनंद फौंडेशन ,डाळमंडई तर्फे महावीर जयंती निमित्त स्नेहालयास २५० स्टील ताटे व २५० स्टील ग्लास जय आनंद ग्रुपचे अध्यक्ष गौरव बोरा व मर्चंट्स बँकेचे संचालक कमलेश भंडारी यांच्या हस्ते स्नेहलयातील रत्नाताई यांच्या कडे देण्यात आले. या वेळी स्नेहालयचे संजय गुगळे, एमआयडीसी मधील उद्योजक जितेंद्र मुनोत, निशांत कर्णावट, खजिनदार सुमित लोढा, माहेश्वरी युवक मंडळाचे अध्यक्ष अमित काबरा व इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना संजय गुगळे म्हणाले स्नेहालय विशेष करून लहान बेवारस मुलांसाठी व समाजातील त्रस्त महिलांसाठी कार्य करीत आहे. स्नेहालय मध्ये ३५० अनाथ मुलं असून त्यामध्ये काही HIV बाधित सुद्धा मुलं आहेत . सर्व सामाजिक घटकांनी यास सर्वतोपरी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.