राज्यात तापमानाचा पारा वाढणार !
मुंबई : येत्या काही दिवसात मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मार्चच्या पहिल्याच आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढल्याने सर्वत्र उकाडा जाणवत आहे. पुढील आठवड्याभरात मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात 2 ते 3 अंश सेल्सिअसने तापमान वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
मार्चच्या पहिल्याच आठवड्यात मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढल्याने सर्वत्र उकाडा जाणवत आहे. हे तापमान पुढील काही दिवसात आणखी वाढणार आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा सरासरी 0.5 ते 1 अंश सेल्सिअस तापमानात वाढ पाहायला मिळणार आहे. याशिवाय फेब्रुवारी महिन्यात ज्याप्रकारे अवकाळी पाऊस पडून गारपीट झाली होती, तशीच परिस्थिती पुढील 2 ते 3 दिवसात दिसण्याची शक्यता आहे. मात्र ही गारपीट कमी प्रमाणात होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. याशिवाय पुढील काही दिवस मराठवाडा, विदर्भात सरासरी तापमान 35 ते 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.