Breaking News

फुटीरवाद्यांचा बंद रोखण्यासाठी श्रीनगरमध्ये निर्बंध

श्रीनगर : फुटीरवाद्यांनी काश्मीर खोर्‍यात पुकारलेला बंद रोखण्यासाठी श्रीनगर शहराच्या काही भागात निर्बंध घालण्यात आली आहेत. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये रविवारी चकमक झाली होती. यात एक दहशतवादी ठार झाला. याच्याच निषेधार्थ सईद अली गिलानी, मीरवायझ उमर फारूक आणि मुहम्मद यासिन मलिक यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त रेजिस्टन्स लीडरशीप या फुटीरतावादी संघटनेने काश्मीर खोर्‍यात बंद पुकारला आहे. राज्य लोकसेवा आयोगाने सोमवारी होणार्‍या नागरी सेवा परीक्षा रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. दक्षिण काश्मीरमध्ये इंटरनेट आणि रेल्वे सेवादेखील बंद करण्यात आल्या आहेत. तर श्रीनगरमध्ये दुकाने, सार्वजनिक वाहतूक बंद आहे. शोपियान जिल्ह्यात लष्करी तळावर रविवारी दहशवाद्यांनी हल्ला केला. शोपियानमधील पिंजोरा परिसरात रविवारी रात्री आठच्या सुमारास दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. दहशवाद्यांचा शोध सुरू आहे.