शहर इलाखा साबांतील रिजॉब नंबर प्रकरण चव्हाट्यावर प्रज्ञा वाळकेंच्या कार्यशैलीने व्यवस्था संभ्रमात
मुंबई सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शहर इलाखा विभागात सन 2014 ते 2017 या कार्यकाळात तत्कालीन कार्यकारी अभियंत्यांनी रिजॉब नंबर प्रकरणात एकाच वेळी मुख्य अभियंता, अधिक्षक अभियंता यांच्यासह शासनाची दिशाभूल केली. तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या आदेशाला पायदळी तुडवत कोट्यावधी रूपयांची देयके बेकायदेशीर पणे अदा केल्याने जनतेच्या सार्वजनिक निधीची उधळपट्टी झाल्याचा आरोप होत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुंबई प्रादेशिक विभागात विशेषतः शहर इलाखा सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार नेहमीच चर्चेत राहिला आहे. या विभागात काम करणारे बहुतांश कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यकाळात निविदा प्रक्रिया राबविण्यापासून प्रत्यक्षात देयके अदा करण्यापर्यंतच्या प्रत्येक टप्यावर कार्यकारी अभियंत्यांच्या मनमानी कार्यशैलीचा बोलबाला राहीला आहे. कंत्राटदारांशी असलेले कार्यकारी अभियंत्यांचे हितसंबंध कित्येकदा बोगस निविदा, बोगस कामे, एमबी पुस्तिकेतील बोगस नोंदी, एखाद्या विश्रामगृहावर घाऊक स्वरूपात एमबी सापडणे, बोगस कंत्राटदार आणि त्यांना अदा झालेली अशीच बोगस देयके अशा वेगवेगळ्या प्रकरणांमधून चव्हाट्यावर आले आहेत. कंत्राटदार आणि कार्यकारी अभियंता यांच्या हितसंबंधांतून फोफावलेली लाचखोरी चर्चेचा विषय बनला. या लाचखोरीने तीस टक्यांची मर्यादा गाठल्याने अन्यायग्रस्तांच्या मनस्तापांतून ही लाचखोरी एसीबीच्या दारापर्यंत पोहचली. तथापी शहर इलाखा साबां विभागात कार्यरत असलेल्या आजवरच्या निर्ढावलेल्या कार्यकारी अभियंत्यांना एसीबीचा धाकही वेसण घालू शकला नाही.
याच परंपरेत सन 2014 ते सन 2017 या कालावधीत कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांची कार्यशैली शहर इलाखाच्या इतिहासात काळ्या कोळशाने लिहिण्याइतकी बदनाम ठरली आहे. मंत्रालयाच्या डेब्रीजपासून तर आमदार कक्षांतील बोगस कामांच्या गैरव्यवहारातून झालेला कोट्यावधीचा अपहार ही शहर इलाखा विभागातील भ्रष्टाचाराची अपत्ये कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांच्या लाडाचे कोड मानले जात आहेत. प्रज्ञा वाळके यांची कार्यकारी अभियंता म्हणून काम करण्याची शैली सकल साबांत रहस्य बनले असून एव्हढी राज्यव्यापी चर्चा होऊन देखील कारवाई रोखण्यात त्यांना येत असलेले यश गुढ बनले आहे. विधीमंडळाच्या सभागृहात चर्चा झडूनही त्यांच्या पदाला धक्का न लागल्याने भ्रष्टतेत आत्मविश्वास बळावल्याचे त्यांच्या नव्याने समोर आलेल्या रिजॉब नंबर प्रकरणाने सिध्द केले आहे. रिजॉब नंबर प्रकरणात प्रज्ञा वाळके यांनी थेट महाराष्ट्र शासन, सार्वजनिक बांधकाम मंत्री, मुख्य अभियंता, अधिक्षक अभियंता या सर्वांची दिशाभूल करून व्यवस्थेला आव्हान दिले आहे. प्रज्ञा वाळके यांच्या रिजॉब नंबर प्रकरणामुळे कोट्यावधीच्या निधीवर दिवसा ढवळ्या दरोडा टाकल्याची चर्चा साबांत सुरू आहे. (क्रमशः)