Breaking News

विकास कामांची पाहणीसाठी महिन्यातून एका दौर्‍याच्या आयोजनांचा जिल्हाधिकार्‍यांचा मनोदय

सातारा, दि. 1 (प्रतिनिधी) : सातारा जिल्ह्यात विविध प्रकल्प पुर्णत्वास आले आहेत. तसेच सातारा जिल्ह्यात जलसंवर्धनाची संकल्पना चांगली रूजली असून याअंतर्गत झालेल्या जलसंधारणाच्या कामासह परिसरातील शेतकर्‍यांनी शेतात केलेल्या पिक पध्दतीच्या बदलासह शेतीच्या मालावर प्रक्रिया करणार्‍या प्रकल्पांच्या यशस्वीतेची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी सातारच्या जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी विविध विभागाच्या विकास कामांची पाहणी करणे तसेच उत्कष्ट काम करणार्‍या स्वयंसेवकाच्या पाठीवर शाब्बासक ीची थाप देण्यासाठी दर महिन्याला पाहणी दौरा आयोजित करण्याचा विचार केला आहे. 


नुकताच जिहे-कठापूर योजनेची कामाची सध्य स्थिती व कोरेगाव तालुक्यातील अनपटवाडी येथ लोकसहभागातून झालेल्या जलसंधारणाच्या कामाच्या पाहणीचा दौरा आयोजित क रण्यात आला. दौर्‍यादरम्यान, जिल्हाधिकारी सिंघल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या चर्चेमध्ये विविध विषयावर सखोल चर्चा झाली. चर्चेअंती विकास कामांची माहिती जनमानसापर्यंत पोहचविण्यासाठी पत्रकारांचे पाहणी दौरे आयोजित केल्यास त्याचा चांगला फायदा होत असल्याचे सिंघल यांनी सांगितले. 
पाहणी दौर्‍याच्या निमित्ताने जिल्ह्यातील अधिकारी आपापल्या विभागाच्या कामाची प्रेझेंटेशन देत असतात. त्यामुळे अधिकार्‍यांसह पत्रकारांनाही प्रत्येक प्रक़ल्पाबाबतची सध्य स्थिती व सध्या प्रकल्पाचे काम गतीने सुरु होण्यासाठी काय गरजेचे आहे, याबाबत अधिकार्‍यांचे मत जाणून घेता येते. तसेच प्रकल्पग्रस्तांना प्रकल्प पुर्ण होण्यापूर्वी किंवा प्रकल्प पुर्ण झाल्यानंतर काय फायदे मिळू शकतात, अशा विविध प्रश्‍नांची उकल होवू शकते. 
पाहणी दौर्‍यानिमित्त कोरेगाव तालुक्यातील अनपटवाडी या गावाचा सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत दुसरा क्रमांक आला. त्यासाठी त्या गावच्या लोकांनी काय योगदान दिले याची माहिती घेण्यासाठी राज्यभरातून लोक येवू लागले आहेत. अनपटवाडी या गावातील लोकांची पूर्वीची पिक पध्दत व आजची पिक पध्दत यातून शेतकरी समृध्द होत चालला असल्याचे दिसून येत आहे. उजाड माळावरील ओघळीतील माती व मुरूम शेतात भरल्यानंतर ज्या शेतात गवत उगवू शकत नव्हते, त्याच शेतात गलांडा, आले, झेंडू, ग्रॅडिलिओच्या फुलासह कांदा-स्ट्रॉबेरीची पिके घेतल्याचे आढळून आले. या पिक पध्दतीमुळे आता शेतकरी व्यावसायिक शेतीचा विचार करू लागला असल्याचे आढळून आले. तसेच शेतक र्‍यांचे छोटे-छोटे गट तयार होवू लागले असून सामुहिकरित्या शेतीमध्ये प्रयोग घेण्यास सुरुवात झाली आहे. 
जिहे-कठापूर योजनेच्या कामाला गेल्या काही वर्षापासून सुरुवात झाली असून आता सर्व पाईपलाईन टाकण्याचे काम तसेच उपसा सिंचन योजनेसाठी लागणारे पंप आता लवकरच बसविण्यात येणार असल्याचे सांगून जलसंपदा विभागाचे अधिक्षक विजय घोगरे म्हणाले, सध्या ही योजना पुर्ण करण्यासाठी सुमारे 223 कोटी रुपयाच्या निधीची गरज आहे. त्यापैकी 20 कोटीची तरतूद राज्य शासनाकडून करण्यात आली आहे. तर उर्वरित 200 कोटी रुपयाची तरतूद केंद्र सरकारकडून करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. हा प्रकल्प पुर्ण करण्यासाठी विविध विभागाच्या ना हरकत दाखल्यांची गरज असते. त्या ना हरकती मिळविण्यास आपणाला यश आले मात्र, सध्या पर्यवरण विभागाने वाळू उपसा क रण्याबाबत न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्यामुळे प्रकल्प पुर्ण करण्यास मोठ्या अडचणी येवू लागल्या आहेत. पावसाळा सुरु झाल्यानंतर प्रकल्पाचे जवळ-जवळ सर्व काम बंद ठेवावे लागत असल्याने वाळूची उपलब्धता होणे गरजेचे आहे.