खैरेंच्या तिथी सेनेला मराठा क्रांती मोर्चाचे खुले आव्हान
नाशिक/प्रतिनिधी ;- संभाजीनगर मध्ये कथित हिंदूत्ववादी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या तिथी सेनेच्या चीव सैनिकांनी मराठा क्रांती मोर्चाच्या मावळ्यांवर केलेला हल्ला षंडत्वाचा कळस असून हिम्मत असेल तर या कावळ्यांनी वैचारीक पातळीवर कुठेही समोरासमोर भिडावे.पाठीत वार करणे ही आमची शिव संस्कृती नाही.कुठलेही आव्हान स्वीकारण्यास मराठा क्रांती मोर्चा सक्षम आहे.अशा शब्दात मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर यांनी संभाजीनगर मधील मारहाणीचा तिव्र निषेध केला.
छञपती शिवाजी महाराजांची जयंती तारखेनुसार करावी की तिथी नुसार हा पारंपारीक वाद पुन्हा उफाळून आला आहे.मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने संघटीत झालेल्या बहुजनांनी या वर्षीपासून तारखेप्रमाणे शिवजन्मोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेऊन दि.19 फेब्रूवारी या दिवशी जयंती उत्सव महाराष्ट्रभर साजरा झाला.इतकेच नाही दिल्लीसह देशभर,विदेशातही याच दिवशी हरहर महादेव ,जय जिजाऊ जय शिवराय ,युवराज शंभो राजांचा जयजयकार करून करोडो लोकांनी छञपतींना अभिवादन केले.जवळपास ऐंशी टक्के समुदायाने तारखेप्रमाणे रयतेच्या राजाचा जन्मोत्सव साजरा करण्याच्या संकल्पनेला मान्यता दिल्यानंतरही काही बांडगूळं जाणीवपुर्वक मनुस्मृतीला अपेक्षित वाद निर्माण करण्याच्या हेतूने तिथीच्या जयंतीचा आग्रह धरीत आहेत.त्याचाच एक भाग म्हणून संभाजीनगर मध्ये भाजपा सेना युतीच्या वतीने तिथीप्रमाणे जयंती साजरी करण्याची तयारी सुरू झाल्याने स्थानिक मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांच्या भावना तिव्र बनल्या आहेत.या पार्श्वभुमीवर तिथीच्या शिवजयंती कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी जाब विचारण्यास गेलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या निवडक कार्यकर्त्यांना चंंद्रकांत खैरे यांच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली.अंगावरचे कपडेही फाडले.अशा बातम्या व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रभर तिव्र पडसाद उमटले.चंद्रकांत खैरेंसह त्यांच्या पक्षाचा निषेध होऊ लागला.
नाशिक जिल्ह्यातूनही या घटनेचा तिव्र निषेध सुरू असून मराठा क्रांती मोर्चा नाशिक जिल्ह्याच्या वतीने चंद्रकांत खैरे यांना जाहीर आव्हान दिले गेले आहे.मराठा क्रांती मोर्चाच्या भावना व्यक्त करण्यासाठी बोलावलेल्या पञकार परिषदेत क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर,गणेश कदम,तुषार जगताप यांनी खैरे प्रवृतीच्या पिलावळीवर तोंडसुख घेतले.
सकल बहुजन छञपतींचा जन्मोत्सव 19 फेब्रूवारीला साजरा करण्याचा आग्रह धरीत असताना ही पिलावळ तिथीचा अट्टाहास धरून पाशवी पेशवाई पुनरूज्जीवित करू पहात आहे.प्रत्येक टप्यावर भाजपाकडून अवमानीत होणार्या शिवसेनेचे संभाजीनगरचे खासदार त्यांच्या गळ्यात गळा घालून तिथीची जयंती साजरी करण्याचा नतद्रष्टपणा करीत आहे.हा कु ठला स्वाभीमान.त्यांच्या चिवसैनिकांनी मराठा क्रांती मोर्चाच्या मावळ्यांवर हात उचलून घोडचुक केली असून त्याची सव्याज परतफेड केल्याशिवाय छञपतींचा समाज स्वस्थ बसणार नाही.या घटनेनंतर या मंडळींना महाराष्ट्रात फिरणे मुश्कील झाले असते.तथापी शिवसंस्कार परवानगी देत नाहीत.याचा अर्थ छञपतींचा हा बहुजन समाज षंढ आहे असा त्यांचा समज असेल तर त्यांना प्रसंगानुरूप जशास तसे उत्तर नक्की मिळेल.असा इशारा करण गायकर यांनी दिला.महाराष्ट्रात ठिकठिकाणी 19 फेब्रूवारी रोजी झालेल्या शिवजन्मोत्सव सोहळ्यात तमाम शिवप्रेमी बहुजनांनी सहभाग नोंदविला आहे.यात भाजप शिवसेनेसारख्या पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचाही समावेश आहे.तरीही पुन्हा ही मंडळी तिथीचा आग्रह धरणार असेल तर त्यांची समजूत काढली जाईल.समजूतीची भाषा समजली नाहीतर बहूजन जनता त्यांना धडा शिकविल असे एका प्रश्नाच्या उत्तरादाखल त्यांनी सांगीतले.ना शिक जिल्हा शिवजन्मोत्सव सोहळ्यात चमकणारे काही चेहरे निषेधाच्या पञकार परिषदेला हजर नसल्याबद्दल पञकारांनी छेडले असता समन्वयकांनी राजकीय शैलीत उत्तर देत मुळ प्रश्नाला बगल दिली.
दरम्यान संभाजीनगर प्रकरणानंतर येत्या 4 मार्च रोजीच्या तिथी जयंती सोहळ्यावर तणावाचे सावट असून मराठा क्रांती मोर्चा आणि भाजपा सेना प्रणित शिवप्रेमींमधील मतभेद कोणते स्वरूप धारण करतात यावर महाराष्ट्राची सामाजिक शांतता अवलंबून आहे.