पुणे : राज्यातील सर्व गावांतील गावठाणांची मोजणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ही मोजणी करण्यात येणार आहे. सर्व्हे आ ॅफ इंडियाच्या मदतीने ड्रोनचा वापर करून गावठाणांमधील मिळकतींची मोजणी करण्यात येणार आहे. राज्यात प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग पुरंदर तालुक्यातील सोनोरी या गावी राब विला जाणार आहे. पुरंदर तालुक्यात राज्यातील सर्व गावठाणांची मोजणी ड्रोनद्वारे करण्यात येणार आहे. राज्यात जमीन मोजणीसाठी पहिल्यांदाच ड्रोनचा वापर होत आहे. या सु विधेमुळे सर्वसाधारण ,पध्दतीने गावठाण मोजणी करण्यासाठी 15 ते 30 दिवस लागतात. मात्र ड्रोनच्या सहाय्याने फक्त एका दिवसात मोजणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर भूमि अभिलेख विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार आहे. राज्य शासनाचा भूमि अभिलेख विभाग काळानुसार कात टाकत असून जमिन मोजणीसाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. सध्यस्थितीत जमिन मोजणीसाठी ईटीएस मशिनचा वापर करण्यात येत असून या मशिनमुळेही जमिन मोजणी लवकर होण्यास मदत होते. मात्र आता भूमि अभिलेख विभाग याही पुढे जाऊन ड्रोनच्या सहाय्याने जमिनींची मोजणी करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व गावठाणांची मोजणी करण्यासाठी ग्रामविकास विभाग आणि जमाबंदी आयुक्त यांची नुकतीच एक बैठक झाली. याबैठकीमध्ये याविषयावर सविस्तर चर्चा होऊन गावठाणांमधील मिळकतींची मोजणी करण्यासाठी सर्व्हे ऑफ इंडियाची मदत घेण्याचा निर्णय झाला. सर्व्हे ऑफ इंडिया या मोजणीसाठी ड्रोनचा वापर करणार आहे. राज्यात प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग पुरंदर तालुक्यातील सोनोरी या गावामध्ये राबविला जाणार आहे. या ठिकाणी येणार्या समस्या, तांत्रिक अडचणी याचा अभ्यास करून त्यामध्ये सुधारणा करून टप्प्याटप्याने राज्यातील सर्व गावठाणांची मोजणी ड्रोनद्वारे केली जाणार आहे. त्यामुळे हा पथदर्शी प्रकल्प यशस्वी होण्यासाठी मागील काही महिन्यांपासून भूमिअभिलेख विभाग यावर काम करत आहे.ड्रोनद्वारे एका मोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यास पुढील चार आठवड्यात याबाबतचे अभिलेख तयार करून अचूकतेची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व गावठाणांची मोजणी ड्रोनद्वारे करण्यात येणार आहे.
राज्यातील सर्व गावठाणांची मोजणी ड्रोनद्वारे करणार
Reviewed by Dainik Lokmanthan
on
09:22
Rating: 5