Breaking News

नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्‍वर येथे जातपंचायतीचा गुन्हा दाखल

त्र्यंबकेश्‍वर, दि. 10, मार्च - नाशिक जिल्ह्यातील पहिलाच जातपंचायतीचा गुन्हा नाशिक जिल्ह्यातील ञ्यंबक पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. एकुण 20 संशयित आरोपींमध्ये राजेवाडीचे सरपंच आणि पोलीस पाटलांचा समावेश आहे. श्रमजीवी संघटनेच्या रेटयाने गुन्हा दाखल झाला असून आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समितीने जात पंचायतीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी लाऊन धरली होती.


ञ्यंबकेश्‍वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजेवाडी भोकरपाडा येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून ते दडपण्यासाठी जातपंचायतीने वाळीत टाकण्याच्या प्रकरणी काल शुक्रवारी सायंकाळी सामा जिक बहिष्कार अधिनियम 2016 प्रमाणे जातपंचायत प्रतिबंधक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदु भाऊ भुरबुडे (वय 45) यांनी दिलेल्या फिर्यादी प्रमाणे दिनांक 7 मार्च 2018 च्या सायंकाळ पासून ते आजपर्यंत वेळोवेळी भोकरपाडा राजेवाडी येथे जातपंचायतीने न बोलणे आणि कुठल्याही कार्यात न बोलावणे अशा प्रकारे वाळीत टाकले आहे.