Breaking News

युक्रांदच्या वाचनालयाचे राशिनमध्ये उद्घाटन

कर्जत तालुक्यातील राशिन येथे युवक क्रांती दलाच्या वतीने पुस्तक संकलनातुन साकारलेल्या वाचनालयाचे बुधवारी सायंकाळी उद्घाटन करण्यात झाले. दै. लोकमंथनचे कुळधरण प्रतिनिधी प्रा. किरण जगताप व प्रा. सोमनाथ गोडसे यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले.


युक्रांदच्या वतीने 12 जानेवारी रोजी युवा दिनानिमित्त सुरु केलेल्या पुस्तक संकलन मोहिमेला राशिन तसेच तालुक्याच्या विविध भागातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमातून संकलित झालेल्या पुस्तकांचे राष्ट्रीय विज्ञान दिन व मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून पत्रकारांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविकातुन शरदचंद्र शेटे यांनी युवक क्रांती दलाच्या माध्यमातून या तरूणांनी सुरु केलेले वाचनालयाचे काम कौतुकास्पद असल्याचे सांगत त्याचा लाभ घेण्याचे आवाहन पालक व विदयार्थ्यांना केले. प्रा. सोमनाथ गोडसे यांनी पुस्तकांच्या वाचनातून मस्तक सुधारते व त्यामधून व्यक्ती, कुटुंब, समाज सुधारतो. युवकांनी टाकाऊ पुस्तकांमधून टिकाऊ समाज घडवण्याचे काम हाती घेतले आहे. डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या प्रेरणेने सुरु केलेले हे कार्य भविष्यात दिशादर्शक ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
यावेळी युक्रांदचे राशिन शहर प्रमुख किरण पोटफोडे, पत्रकार विश्‍वास रेणूकर, किशोर कांबळे, संपादक महादेव सायकर, प्रा. किरण जगताप, प्रा. सोमनाथ गोडसे, युवा नेते सुधीर जगताप, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय गोसावी, डॉ. शिवाजी काळे, डॉ. राजकुमार आंधळकर, युवराज भोसले, युक्रांदचे दादा राऊत, वसीम काझी, विनोद सोनवणे, प्रकाश कदम, निलेश काळे, कमलाकर शेटे, संदीप सायकर, मयूर धनवडे, शरद आढाव, प्रतिक साळवे, बिभीषण गदादे, सागर मोढळे, विजय सुरवसे, संगिता पानसरे, स्नेहल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. किशोर जाधव यांनी आभार मानले.