साई आदर्श मल्टीस्टेट पतसंस्थेस बँको पतसंस्था पुरस्कार 2018 चा पुरस्कार
महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला बळकटी आणणार्या पतसंस्थाना त्यांच्या कार्यास प्रोत्साहन मिळावे या हेतूने अविज् पब्लिकेशन्स कोल्हापूर व गॅलेक्सी इनमा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी बँको पुरस्काराचे आयोजन केले जाते. या वर्षीच्या बँको पतसंस्था पुरस्कार 2018 साठी साई आदर्श मल्टीस्टेटने सादर केलेल्या माहितीच्या आधारे तज्ज्ञ निवड समितीने केलेल्या मुल्यांकनानुसार मल्टीस्टेट पतसंस्था विभागामध्ये बँको पतसंस्था पुरस्कार 2018 साठी साई आदर्श मल्टीस्टेटची निवड करण्यात आलेली होती. यावेळी बोलताना आमदार निरंजन वसंत डावखरे म्हणाले की, समाजासाठी झटून काम करतांनाच आर्थिक संस्थांनी अर्थकारणही जपले पाहिजे. पुरस्कार मिळाल्यानंतर संस्थेचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना सांगितले की, हा पुरस्कार म्हणजे आम्ही केलेल्या चांगल्या कामाची पावती आहे. संस्थेच्या प्रगतीसाठी गेली 5 वर्षापासून आम्ही अविरतपणे झटत आहोत. त्याचाच परिपाक म्हणून 50 कोटींच्या पुढे ठेवींचा आकडा गेला आहे. हाच विश्वास जिंकण्यात आम्हीं यशस्वी ठरलो याचा आम्हाला अभिमान आहे. या यशामध्ये संचालक मंडळ व कर्मचार्यांचेही मोठे सहकार्य लाभले आहे. सभासद, ठेवीदार यांनी मोठा विश्वास आमच्यावर टाकला आहे. त्यास आम्ही कधीही तडा जाऊ देणार नाही. यापुढे ही संस्था आणखी झपाट्याने प्रगती करेल असा शब्द आम्ही सभासदांना देतो.