Breaking News

नागापुर येथे आढळले चार बछडे


गोदाकाठ भागात बिबटयांनी गेल्या काही वर्षांपासुन ठाण मांडले आहे. नागापुर (ता. निफाड) येथे शनिवार (दि.24) रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास शरद नाठे (गट नं. 222, 226) यांच्या शेतात ऊस तोड मजुरांना बिबट्यांचे दहा-बारा दिवसांपुर्वी जन्मलेली चार बछडे आढळून आल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नाठे यांची नागापुर गावाच्या शेजारी शेती क्षेत्र असुन, शनिवारी सकाळी या क्षेत्रातील ऊस तोडण्यासाठी मजूर दाखल होताच त्यांना बिबटयाची चार बछडे आढळून आले. याविषयी स्थानिकांनी पो लिस पाटील गडाख यांना माहिती दिली, त्यांनी वनविभागाला माहिती कळविल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत, बछडे ताब्यात घेतले.