Breaking News

क्रीडा क्षेत्राला उत्कृष्ट पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशील - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन क्रीडा क्षेत्राला उत्कृष्ट पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असून क्रीडा संघटनांचाही प्राधान्याने उत्कृष्ट खेळाडू निर्माण करण्याचा दृष्टिकोन असावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाणेफेक करुन शिवाजी पार्क जिमखानातर्फे (एसपीजी) शिवाजी पार्क (दादर) येथे आयोजित स्व.विजय मांजरेकर- रमाकांत देसाई टी-20 क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य सामन्याचा प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार सदानंद सरवणकर, ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल मारपकवार, शिवाजी पार्क जिमखान्याचे (एसपीजी) अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू प्रवीण आम्रे, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवक श्रीमती विशाखा राऊत, संदीप देशपांडे, एसपीजीचे व्यवस्थापकीय विश्वस्त अनिरुद्ध जोशी, चेअरमन अविनाश कामत, प्रसिद्ध माजी रणजीपटू पद्माकर शिवलकर आदी उपस्थित होते.