आधारकार्ड नोंदणीची लुट थांबविण्यासाठी राष्ट्रवादीचे निवेदन
जळगांव - जळगाव जिल्ह्यात आधार केंद्रांवर नवीन नोदणी व दुरुस्तीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. मात्र, या केंद्रांवर नागरिकांकडून अवास्तव रक्कम घेण्यात येत आहे. प्रत्येक केंद्रावर या रक्कमेत मोठी तफावत दिसून येत असून नागरिकांची सर्रासपणे आर्थिक लुट होत आहे. ही लुट त्वरित थांबविण्यासाठी जिल्हाधिकारी यांना राष्ट्रवादीतर्फे निवेदन देण्यात आले आहे.
राष्ट्रवादीकडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आधार नोंदणीची पोचपावतीवर सरकारी रक्कम नमूद करण्यात यावी, प्रत्येक आधार केंद्रावर नोंदणी रक्कमेची पाटी लावण्यात यावी व नाग रिकांची होत असलेली आर्थिक लुट थांबवावी. निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांनी या मागण्यांचे निवेदन स्विकारले.