नाशिक जिल्हा मजूर फेडरेशन अध्यक्षपद निवडणूक 19 मार्चला
नाशिक - नाशिक जिल्हा मजूर सहकारी फेडरेशनच्या अध्यक्ष , उपाध्यक्ष पदासाठी सोमवार दि.19 मार्च रोजी निवडणुक होत आहे. अध्यक्ष सतीश सोमवंशी व उपाध्यक्ष जगन्नाथ वाजे यांनी रोटेशनप्रमाणे राजीनामा दिल्याने ही निवडणूक होत आहे. अध्यक्ष, उपाध्यक्षपदी नवीण चेहर्यांना संधी दिली जाणार असल्याने इच्छूकांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे.
मजूर फेडरेशनच्या कार्यालयात सकाळी 11 वाजता निवडणुक अधिकारी मनिषा सौंदाणे यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष बैठक आयोजीत केली आहे. बैठकीत अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड प्रक्रीया राबविली जाईल.
सन 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर अध्यक्ष व उपाध्यक्षपदी अनुक्रमे प्रमोद मुळाणे व चिंतामण गावित यांना संधी देण्यात आली होती. त्यांचा एक वर्षांचा
कालावधी संपल्यानंतर त्यांनी राजीनामे दिले . त्यानंतर, मे 2017 मध्ये देवळा प्रतिनिधी सतीश सोमवंशी यांना अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी जगन्नाथ वाजे यांना संधी देण्यात आली होती. या निवडीप्रसंगी इच्छुकांची संख्या वाढल्याने ज्येष्ठ संचालकांनी बैठक घेऊन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा कालावधी सहा-सहा महिन्यांचा करत नव्या चेहर्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सहा महिने उलटून राजीनामे दिले जात नसल्याने संचालकांनी ठरल्याप्रमाणे राजीनामे द्यावे, अशी मागणी केली. त्याप्रमाणे सोमवंशी व वाजे यांनी राजीनामे दिले आहेत.
अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी इच्छुकांनी तयारी सुरू केली असून फिल्डींग लावली जात आहे.
नविन चेहर्यांना संधी
गतवेळी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडी प्रसंगी निवडीचे सर्वाधिकार केदा आहेर, राजेंद्र भोसले, संपत सकाळे यांना देण्यात आले होते. त्यानुसार,या संचालकांनी सर्व संचालकांची बाजू ऐकून, नवीन चेहर्यांना संधी मिळावी, यासाठी अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचा कालावधी हा सहा-सहा महिन्यांचा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सर्व नवीन संचालकांना संधी मिळणे शक्य होणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार यंदा नव्या चेहर्यांना संधी देण्याच्यादृष्टीने तयारी केली जात आहे.