Breaking News

परिचारकांचा निर्णय विधान परिषदेने घ्यावा : मुख्यमंत्री

आमदार प्रशांत परिचारक हे वरिष्ठ सभागृहाचे सदस्य आहेत. त्यांच्या निलंबन रद्द किंवा बडतर्फीच्या संबंधीचा निर्णय हा वरिष्ठ सभागृहाचा विषय आहे. त्यामुळे विधान परिषदेत जो निर्णय होईल तशीच भूमिका राज्य सरकारची असेल, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले. प्रशांत परिचारक यांच्या निलंबन प्रश्‍नावर उत्तर देताना मुख्यमंत्री यांनी भूमिका स्पष्ट केली. परिचारक हे वरिष्ठ सभागृहाचे सभासद असल्यामुळे जो निर्णय विधान परिषदेत होईल तशीच भूमिका घेण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील यांनी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे यांच्याबाबतची चर्चादेखील पटलावरून कमी करण्याची मागणी केली. वळसे पाटील यांची ही मागणी अध्यक्षांनी फेटाळून लावली.