श्रीलंकेत दहा दिवसांसाठी आणीबाणी मुस्लीम आणि बौद्ध धर्मीयांचा वाद चिघळला
कोलंबो : श्रीलंकेत 10 दिवसांच्या आणीबाणीची घोषणा मंगळवारी करण्यात आली. श्रीलंकेच्या कँडी भागात बौद्ध आणि मुस्लिम समुदायातील वादाच्या पार्श्वभूमीवर ही आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. श्रीलंकेत वर्षभरापासून या दोन समुदायामध्ये मोठ्या प्रमाणात तेढ निर्माण झाला आहे. पण गेल्या काही दिवसांपासून येथील हिंसाचार प्रचंड वाढला आहे. त्यामुळे कँडी भागातील हिंसाचार इतर भागात पसरु नये यासाठी संपूर्ण देशात आणीबाणी लागू करण्याचा निर्णय श्रीलंकेच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे.
बौद्ध आणि मुस्लीम धर्मीयांमध्ये गेल्या वर्षभरापासून संघर्ष आणि वाद सुरु आहे. बौद्ध धर्मीयांना जाणीवपूर्वक मुस्लीम धर्मांतर करण्यास भाग पाडत आहेत असा आरोप बौद्ध धर्मीयांनी केला आहे. तसेच बौद्ध धर्माचा वारसा असलेली धार्मिक स्थळे उद्धवस्त केली जात असल्याचाही आरोप होतो आहे. हा सगळा वाद चिघळल्यामुळे आणि शिगेला पोहचल्यामुळे श्रीलंकेत 10 दिवसांची आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.
म्यानमार मध्ये उसळलेल्या संघर्षानंतर काही रोहिंग्या मुस्लिमांनी श्रीलंकेत आश्रय घेतला होता. मात्र याबाबतही काही बौद्ध धर्मीयांनी विरोध दर्शवला होता. तसेच त्यांना आश्रय दिला जाऊ नये म्हणून आंदोलनही केले होते. गेल्या वर्षभरापासून हा संघर्ष सुरु आहे. हा वाद चिघळू लागल्याने दोन समाजांमध्ये आणखी काही तेढ निर्माण होऊ नये श्रीलंका सरकारने आणीबाणी जाहीर करण्याचा निर्णय दरम्यान, भारतीय संघ सध्या श्रीलंकेतच आहे. मात्र, तिरंगी मालिकेच्या वेळापत्रकानुसारच सर्व सामने खेळवण्यात येणार असल्याचं सूत्रांकडून समजते आहे. कारण की, हिंसाचार कँडीमध्ये उसळला आहे पण तिरंगी मालिकेतील सर्व सामने हे कोलंबोमध्ये होणार आहेत. त्यामुळे या आणीबाणीचे क ोणतेही सावट सामन्यांवर नसल्याचे सांगण्यात येत आहे.