Breaking News

भाषाच मनुष्याला समृद्ध करते - खा. अशोक नेते


गडचिरोली - हिंदी ही राष्ट्रभाषा असून, सर्वसामान्यांना ती अवगत होणे गरजेचे आहे. विद्यार्थी व शिक्षकांनी राष्ट्रभाषेवर प्रभुत्व निर्माण करावे. कारण भाषा मनुष्याला समृद्ध करते, असे प्रतिपादन खा.अशोक नेते यांनी केले. खा. अशोक नेते यांच्या निधीतून गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील शाळा, महाविद्यालयांना हिंदी साहित्याच्या पुस्तकांचे वितरण व मुख्याध्यापकांचा सत्कार नेते यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते.

राष्ट्रभाषेचा प्रचार व प्रसाराकरिता नेते यांच्या निधीतून 22 लाख रुपयांची तरतूद मंजूर करण्यात आली होती. या निधीतून प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांना प्रत्येकी 10 रुपये याप्रमाणे 6 लाख रुपये, माध्यमिक शाळांना प्रत्येकी 25 हजार रुपये याप्रमाणे 8 लाख रुपये व महाविद्यालयांकरिता प्रत्येकी 50 हजार रुपये याप्रमाणे 8 लाख रुपयांची हिंदी साहित्याची पुस्तके वितरीत करण्यात आली. 108 शाळा, महाविद्यालयांना ही पुस्तके देण्यात आली. याप्रसंगी मुख्याध्यापकांचा सत्कारही करण्यात आला. सर्वांनी अवांतर वाचनाची गोडी लावावी, असे प्राचार्य डॉ.खालसा म्हणाले. नेते यांनी आपल्या निधीतून पुस्तके उपलब्ध करुन दिल्याबद्दल प्राचार्य डॉ.खालसा यांनी नेते यांचे आभार मानले.