दुरसंचार क्षेत्रात नोकर्यांचे संकट
भावनिश्चितीच्या युद्धामुळे दुरसंचार कंपन्यांच्या उत्पन्नात चांगलीच घट निर्माण झाली. ज्यामुळे या क्षेत्रात हजारो नागरिकांना नोकर्या गमवाव्या लागल्या. आताही येत्या 6 महिन्यांमध्ये जवळपास 90 हजार नागरिकांना नोकर्या गमवाव्या लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उखएङ कठ सर्व्हिसेसच्या एका रिपोर्टनुसार मागील वर्षी दुरसंचार क्षेत्रातील 40 हजार नागरिक बेरोजगार झाले आहेत. येत्या 6 महिन्यांत जवळपास 90 हजार नागरिकांना नोकर्या गमवाव्या लागण्याची शक्यताही या रिपोर्टमध्ये व्यक्त करण्यात आली आहे.