प्रत्येक जिल्ह्यात कृषी महोत्सव घेण्याचा शासनाचा संकल्प - जयकुमार रावल
नंदुरबार, दि. 26, मार्च - जिल्ह्यांना अभिमान वाटतील असे शेतकरी नंदुरबार जिल्ह्यात आहेत, शेती आणि मातीची संवादयात्रा म्हणून जिल्ह्यात कृषि महोत्सव राबविण्यात येत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दरवर्षी कृषि महोत्सव घेण्याचा संकल्प शासनाचा असल्याचे प्रतिपादन नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी येथे केले.नंदुरबार जिल्हा कृषि महोत्सव-2018 चे उद्घाटन पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
पालकमंत्री पुढे म्हणाले, या कार्यक्रमातून शेतक-यांनी प्रेरणा घेवून शासनाच्या विविध कृषि योजना, उपक्रमांची माहिती, संशोधित कृषि तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण प्रयोगशील शेतक-यांचे अनुभव, बाजारपेठ व्यवस्थापन, कृषि पुरक व्यवसाय आदिबाबत माहिती घेवून शेती करावी. यात्रिकरण योजनेअंतर्गत राज्यात 8 हजार ट्रॅक्टर वितरीत होणार असून नंदुरबार जिल्ह्याला दिलेले 200 ट्रॅक्टर वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे. शेतकरी विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतक-यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्यात आली असून अजून कोणी शेतकरी राहिले असतील त्यांना 31 मार्च पर्यंत या योजनेचा लाभ घेता येईल. शेतक-यांला कर्जमुक्ती करण्यासाठी शासनामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.