Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी थोरात


राष्ट्रवादी कार्यालयात पक्षाचे तालुका निवडणूक निर्णय अधिकारी मिनानाथ पांडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत संगमनेर तालुकाध्यक्षपदी येथील धवलक्रांतीचे प्रणेते आबासाहेब थोरात यांची एकमताने फेरनिवड करण्यात आली.

दरम्यान, दिलीप शिंदे, शौकत जहागिरदार आणि अविनाश थोरात यांची प्रदेश प्रतिनिधीपदी एकमताने निवड करण्यात आली. जिल्हा प्रतिनिधी म्हणून बाळासाहेब निवृत्ती ढोले, शेख शरिफ, विलास शेळके, सरूनाथ उंबरकर, विजय कडलग, अण्णासाहेब गोडसे, रौफ शेख, उषा नेहूलकर यांची एकमताने निवड करण्यात आली. या बैठकीस प्रमुख पदाधिकारी त्याचप्रमाणे कपिल पवार, संतोष शेळके, किरण घोटेकर, प्रशांत वामन, वैशाली राऊत, अमृता कोळपकर, हफिज शेख, भाऊसाहेब धुमाळ, मिर्झालाल पठाण, विठ्ठल गुंजाळ आदी उपस्थित होते.