कोपरगाव : येथील गणेश खरात ( वय-३० वर्ष) याने शारीरिक संबंधाला नकार दिल्याने पत्नीला कुऱ्हाडीने वार करून ठार मारले. बायकोच्या शेजारीच गणेशची ३ महिन्यांची मुलगी झोपली होती. अटक झाल्यानंतर या मुलीचं काय होणार, या विचाराने वैतागलेल्या गणेशने बायकोपाठोपाठ मुलीलाही मारून टाकले. दोन हत्या केल्यानंतर गणेश थंड डोक्याने स्वत: पोलिसांसमोर हजर झाला. त्याने पोलिसांना हत्येची माहिती दिली. गणेशने त्याच्या सासूवरही हल्ला केला. या हल्ल्यात सासू रुक्मिणी गवई या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी शिर्डीतील साईनाथ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
शारीरिक संबंधास नकार दिल्याने पत्नी आणि मुलीची निर्घृण हत्या आरोपी पोलिसांसमोर हजर
Reviewed by Dainik Lokmanthan
on
13:39
Rating: 5