मातंग समाजाच्या तरुणांनी कामाला लागावे : कांबळे
ते पुढे म्हणाले की, मातंग समाजाच्या सर्जेराव मांग व येल्ला मांग, राघोजी साळवे, लहुजी वस्ताद साळवे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तसेच पोचिरराम कांबळे जोपर्यंत कळणार नाही, तोपर्यंत तरुण वर्ग संघटित होणार नाही. आपल्यासाठी बलिदान दिलेल्या महामानवाचा प्रसार व प्रचार करून आजचा हा तरुण उद्याचा ‘वारणेचा वाघ’ अर्थात लहुजी वस्ताद झाल्याशिवाय राहणार नाही, असे स्पष्ट कांबळे यांनी स्पष्ट केले. यावेळी अकोले शहरातील मोठी उंबरे परिसरात साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि आद्य क्रांतीवीर लहुजी साळवे यांच्या तैलचित्राचा अवमान केल्याबाबदल लहुजी टायगर सेना महाराष्ट्र राज्य शाखा श्रीरामपूर, मांग गारुडी युवक संगटना, लहुजी शक्ती सेना श्रीरामपूर यांच्यावतीने या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला. समाजामध्ये तिढा व घृणा पसरविणाऱ्या प्रवृत्तीच्या आरोपींना तात्काळ अटक करून स्थानिक प्रशासनाने कडक शासन करावे, अशा मागणीचे निवेदन श्रीरामपूर तहसीलदारांना देण्यात आले.
या बैठकीस लहुजी शक्ती सेनेचे तालुकाध्यक्ष कैलास उमाप, महिला आघाडी तालुकाध्यक्ष पूजा सोलंकी, भागचंद नवगिरे, सुरेश दोडके, कालू सोनवणे, प्रशांत जगधने, सुधीर भास्कर, मोहन आव्हाड, अनवर मन्सूरी, कृष्णा उमाप, संदीप अडांगळे, काळू राक्षसे आदी उपस्थित होते.