पंतप्रधानांना पीएनबी घोटाळ्याची माहिती होती- हार्दिक पटेल
नागपूर - पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) घोटाळ्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींना होती असा खळबळजनक आरोप पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी आज, शुक्रवारी नागपुरात केला.
अकोला येथे एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी ते नागपुरात आले होते. नागपुरात त्यांनी दीक्षाभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थींचे दर्शन घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पटेल म्हणाले की, फरार हिरे व्यापारी नीरव मोदी यांनी केलेला पीएनबी घोटाळ्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना होती. पीएनबी घोटाळ्याबद्दल आपाज असल्याचे वक्तव्य मोदींनी केले आहे. यावरून त्यांना या घोटाळ्याची पूर्वकल्पना होती, हे स्पष्ट होते. या घोटाळ्याची पूर्वकल्पना असताना चुप्पी साधणे हा देशद्रोह नाही काय, असा सवाल त्यांनी केला.