Breaking News

आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्याची नक्षल्यांनीच केली हत्या

गडचिरोली, सशस्त्र नक्षल्यांनी काल(ता.23)रात्री धानोरा तालुक्यातील दराची येथे वास्तव्य करणार्‍या एका आत्मसमर्पित नक्षल्याची हत्या केली. तलवार मडावी(22) असे मृत नक्षल्याचे नाव आहे.

प्राथमिक माहितीनुसार, काल रात्री 10 ते 15 नक्षली तलवार मडावीच्या घरी गेले. त्यास झोपेतून उठवून गावाबाहेर नेले आणि गोळ्या झाडून त्याची हत्या केली. तलवार मडावी याने 2013-14 मध्ये पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले होते. तेव्हापासून तो गावातच राहत होता. दरम्यान तलवार मडावीच्या हत्येमुळे पुन्हा एकदा आत्मसमर्पित नक्षल्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.