Breaking News

दुर्लक्षित रस्त्याची नगराध्यक्षांकडून पाहणी; काम पूर्ण करण्याचा दिला शब्द


शहरातील छत्रपती शिवाजी चौक ते जुना म्हातारपिंप्री रोड या रस्त्याने कंद्राप मळ्यातील नागरिक रहदारीसाठी याच रस्त्याचा वापर केला जातो. परंतू या भागातील नागरिकांना पावसाळ्यात रहदारीसाठी मोठी असुविधा होते. हा करण्याची अनेक वर्षापूर्वीची मागणी होती, परंतू नगरपरीषदेकडून कायमच दुर्लक्ष करताना दिसून येत होते. या रस्त्यासाठी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संतोष खेतमाळीस यांनी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांचेकडे आग्रह धरत मागणी रेटून धरल्याने कालरोजी स. 10 वा. नगरपालिकेतील विरोधी नगरसेवक अख्तर शेख, सतिष मखरे, युवा नेते अमोल शेलार, सागर बोरूडेंनी पाहणी केली. यावेळी ज्येष्ठ नागरिक झुंबर खेतमाळीस, गणपत खेतमाळीस, विठ्ठल खेतमाळीस, पोपट खेतमाळीस, ज्ञानेश्‍वर आनंदकर, मच्छिंद्र शेंडगे, बंडू खेतमाळीस, अंबर खेतमाळीस, बबन आनंदकर, जालिंदर शेंडगे, रोहिदास देवकर, सचिन खेतमाळीस, शिवसेनेचे नाथा पवार यांसह यावेळी दोनशेहून अधिक नागरिक उपस्थित होते. नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी सांगितले की, या रस्त्याचे काम लवकरच मार्गी लावण्याचा शब्द त्यांनी यावेळी दिला. त्याचबरोबर पालिकेच्या संबंधित अधिकार्‍यांस फोन करून रस्त्याची पाहणी करून, तातडीने अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश दिल्याने या भागातील नागरिकांनी नगराध्यक्ष मनोहर पोटे, संतोष खेतमाळीस, अख्तर शेख, अमोल शेलार, सागर बोरूडे, सतिष मखरे यांचे अभिनंदन केले आहे.