Breaking News

अण्णांच्या आंदोलनास जामखेडमधून पाठिंबा तहसिल कार्यालयासमोर बैठे आंदोलन


देशाची राजधानी दिल्ली येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी निवडणूक प्रक्रियेतील सुधार व भ्रष्टाचार या विषयी सरकारच्या विरोधात जो सत्याग्रह चालू केला आहे, त्यास पाठींबा म्हणून जामखेड येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या अनुयायींच्यावतीने पाठींबा म्हणून तहसिल कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह करण्यात आला. हजारे यांनी दिल्ली येथे भारत सरकारच्या विरोधात देशातील भ्रष्टाचार तसेच पंचवार्षिक निवडणुकीतील त्रुटी त्यातील बदल तसेच देशपातळीवर विविध क्षेत्रात चालू असलेला भ्रष्ट कारभार शेतकर्‍यांवरील अन्याय-अत्याचार लोकपाल विधेयक तसेच यासम अनेक प्रश्‍नाच्या संदर्भात दिल्ली येथील रामलीला मैदानावर सुरू केलेल्या आंदोलनास देशातील प्रत्येक प्रातांतून व प्रातांतील जिल्हा तालुका व गावपातळीवरून शेकडो कार्यकर्त्यांनी समर्थन देऊन पाठींबा दर्शवला आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुरू केलेले हे जन आंदोलन यशस्वी व्हावे, तसेच सरकारने त्यांच्या सर्व आंदोलनातील मुद्यांचा विचार करून अण्णा हजारे यांच्या माध्यमातून न्याय मिळवून द्यावा, यासाठी सर्व स्तरातून शासनावर लोकशाही पद्धतीने व आंदोलनाच्या मार्गाने दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असतानाच, जामखेड तालुक्याच्या वतीने अण्णा समर्थक व माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर राळेभात, शिवसेना तालुकाप्रमुख शहाजी राजेभोसले, अमित जाधव, हभप अमृत महाराज डुचे, शिव अभ्यासक गुलाब जांभळे, अवधूत पवार, बापुसाहेब गायकवाडसह शेकडो अण्णा हजारे यांच्या समर्थकांनी जामखेड तहसिलसमोर बैठे आंदोलन व सत्याग्रह करून आण्णा हजारे यांच्या दिल्लीतील आंदोलनास आपला पाठींबा दर्शवला. यावेळी उपस्थितांनी आपल्या भावना स्पष्ट केल्या.