तालुक्यातील पिसोरे खांड येथील एका विवाहित महिलेने आपल्या दोन लहान मुलींना विषारी औषध पाजून स्वतः आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना गुरुवारी सायं. 7 वाजण्याच्या सुमारास घडली. तालुक्यातील पिसोरे खांड येथील विवाहिता श्यामल गणेश यरकळ या 28 वर्षीय महिलेने आपली मोठी मुलगी आराध्या (वय 3 वर्ष) आणि दुसर्या 9 महिन्याच्या मुलीस विषारी औषध पाजून स्वतः आत्महत्या केली. यातील 9 महिन्यांच्या मुलीची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरेखांड येथे यरकळ कुटुंबीय वास्तव्यास आहे. येथील विवाहित महिला श्यामल हिने सायंकाळच्या दरम्यान दोन्ही मुलींना घरात घेऊन विषारी औषध पाजले. यातील तीन वर्षीय आराध्याला जास्त प्रमाणात औषध पाजले गेल्याने ती जागीच गतप्राण झाली. नऊ महिन्याच्या लहान मुलीलाही विष पाजून स्वतः औषध प्राशन करून आत्महत्या केली. दरम्यान या विवाहितेने मुलींना औषध पाजून स्वतः आत्महत्या का केली? याबाबत कसलीही माहिती उपलब्ध झालेली नाही. कौटुंबीक वादातून आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या दुर्घटनेमुळे पिसोरे खांड गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान या विवाहितेच्या पतीस जुगार, दारू मटका याचा नाद असून त्याच्या या जाचामुळे आपला पुढील संसार कसा होणार? असा प्रश्न उपस्थित झाल्याने शामल हिने आत्महत्येचा मार्ग पत्करला असल्याची चर्चा तालुक्यात व्यक्त केली जात आहे.
चिमुरडीला विषारी औषध पाजून विवाहितेची आत्महत्या
Reviewed by Dainik Lokmanthan
on
11:52
Rating: 5