भाविनिमगावात हनुमान मंदिराचा लोकसहभागातून जीर्णोद्धार
रामभक्त हनुमान मंदिरची केवळ शंभर दिवसात उभारणी करून लोकसहभागातून गाव काय करू शकते याचे एक आदर्शवत काम गावाने करून दाखवले आहे. सविस्तर माहिती अशी की शेवगाव तालुक्यातील भाविनिमगाव येथील जुने दगड मातीचे बांधकाम असलेले हनुमान मंदिर पुर्ण मोडकळीस आले होते. मंदिराच्या नवीन बांधकामचा विषयही अनेकदा ग्रामसभेतुन चर्चिला गेला मात्र 10 लाखापेक्षा जास्त रकमेची गरज या नवीन मंदिर बांधकामासाठी लागणार असल्याची कल्पना आल्याने इतका पैसा कुठल्या मार्गाने उपलब्ध होणार याची चर्चा घडली मात्र मार्ग निघाला नाही. मात्र मंदिर उभारण्याची मनिषा मात्र अनेकांना होती त्यातुनच अनेकांनी उपाय सांगितले मात्र आधीच गावाला ग्रामदैवत भवानी (जगदंबा) माता देवस्थानचे वर्षातील दोन मोठे उत्सव ( चैत्र पौर्णिमा व नवरात्रोत्सव) लोकवर्गणीतून दरवर्षी साजरे होतात व त्यातच या नवीन बांधकामासाठी गावकरी वर्गणी करतील का हा प्रश्न होता मात्र गावकर्यांच्या उत्साही पुढाकाराने एक दिवस हनुमान मंदिरात बैठक आयोजित करण्यात आली व त्यात सर्वानुमते नुतन रामभक्त हनुमान मंदिर लोकसहभागातून उभारण्याचे ठरवले त्यासाठी नोकरदार, जमीनदार, व्यावसायिक, मजुर, कामगार यांच्या ऐपतीप्रमाणे वर्गणी जमा करण्याचे ठरले व बघता बघता आजपर्यंत 15 लाखापेक्षा जास्त रक्कम जमा झाल्याचे व्यवस्थापनाकडून माहित समजली आहे. यात एक हजार रुपये ते एक लाख रुपयांपर्यंत अनेक दानशूर व्यक्तींचा समावेश आहे. दसर्याच्या शुभ मुहूर्तावर सुरू करण्यात आलेले मंदिर उभारणीचे काम अवघ्या शंभर दिवसात पूर्ण करण्यात आले असून रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर मंदिर गाभार्यात रामभक्त हनुमान मूर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.