बैठा सत्याग्रह करून अण्णांच्या आंदोलनाला पाठींबा
पाथर्डी, अण्णा हजारे यांनी दिल्ली येथे 23 मार्च रोजी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठींबा म्हणून जो पर्यत अण्णांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत बैठा सत्याग्रह करण्याचा निर्णय पाथर्डी तालुका भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात आला असुन पाथर्डी तहसिल आवारात या सत्याग्रहाला सुरवात करण्यात आली आहे.
पाथर्डीतील सामाजिक कार्यकर्त्यांच्या व तालुका समिती मार्फत याआधी तहसीलदार नामदेव पाटील यांना अण्णा हजारे याच्या आंदोलनासाठी पाठींब्याचे पत्र देण्यात आले होते. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे दिनांक 23 मार्च पासून दिल्ली येथे रामलीला मैदानावर आंदोलन करत असुन जोपर्यंत जन लोकपाल, लोकआयुक्त व शेतकार्यांच्या विविध मागण्या मान्य होत नाही . तोपर्यंत त्यांना पाठिबा म्हणून पाथर्डीत बैठा सत्याग्रह सुरू करण्यात आला आहे. यावेळी किसन आव्हाड, प्रा. सुनिल पाखरे, पत्रकार हरिहर गर्जे, भास्कर दराडे, शंकर डाळिंबकर आदि उपस्थित होते.