Breaking News

ग्रामविकास अधिकार्‍याच्या मनमानी कारभारा विरोधात वरुर ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन !


शेवगाव ता. प्रतिनिधी - वरुर गावचे ग्रामविकास अधिकारी डी.बी.पवार यांच्याविरोधात वरूर ग्रामस्थांनी आज गटविकास अधिकारी शेवगाव, यांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन केले. ग्रामविकास अधिकारी डी.बी पवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे अशी मागणी गावकर्‍यांनी गटविकास अधिकारी डॉ. बंकट आर्ले यांच्याकडे केली.सदर निवेदनात उपसरपंच गोपाळ खांबट यांनी म्हटले आहे क, ग्रामविकास अधिकारी हे सरपंचाच्या मनमानी नुसार काम करत आहेत, त्यामुळे उपसरपंचासह इतर सहा सदस्यांवर या गोष्टीचा अन्याय होत आहे. झालेल्या मासिक सभांचे प्रोसिडिंग न देणे, महिला सदस्यांना अर्वाच्च भाषेत बोलणे ग्रामपंचायत सदस्यांना व उपसरपंचांना उडवडी ची उत्तरे देणे, तसेच गावाच्या विकासाबाबत गावकर्‍यांना सहकार्य न करणे, मी तुमचे कोणतेही काम ऐकणार नाही काय करायचे ते करून घ्या असे गंभीर स्वरूपाचे आरोप गोपाळ खांबट यांनी निवेदनाद्वारे केली आहेत. आज ज्या वेळेस सहा सदस्य व उपसरपंच गटविकास अधिकार्‍यांच्या दालनात हे आंदोलन करून बसले असता, त्यांना कोणतेही ठोस आश्‍वासन देण्यास गटविकास अधिकारी तयार नव्हते. यावरुन एक लक्षात येते की वरिष्ठ अधिकारी आपल्या कनिष्ठ अधिकार्‍याला पाठीशी घालताना दिसत आहेत. ज्या वरिष्ठ अधिकार्‍यावर लोकशाही मुल्य सक्षमपणे अंमलबजावणी करण्याचे कर्तव्य असते तेच अधिकारी आज लोकशाही मुल्य पायदळी होताना दिसत आहेत. यावेळr उपसरपंच गोपाळ खांबट, वरुर ग्रा.पं. सदस्य सुरेश वावरे, सदस्य अर्जुन तुजारे, सदस्य शामिया पठाण, सदस्य सौ. शारदा मस्के, सदस्या गयाबाई गरुड इत्यादी मान्यवरांच्या हस्ते यावेळी गटविकस अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.