Breaking News

ताजनापुर लिफ्ट पाणी कृती समितीची बैठक, योजना एका वर्षात पूर्ण करण्यासाठी निधीची मागणी


शेवगाव, येथे ताजनापुर लिफ्ट टप्पा क्र-2 च्या 20 गावातील युवक व जेष्ठ शेतकर्‍यांची नुकतीच बैठक संप्पन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्ष स्थानी चापडगावचे उपसरपंच पंडितराव नेमाने होते. या बैठकीसाठी ताजनापुर लिफ्ट पाणी कृती समितीचे अध्यक्ष जगन्नाथ गावडे , जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे , देवराव दारकुंडे, अ‍ॅङ संजयराव काकडे, डॉ.अशोक झिरपे, सरपंच मनोहर झिरपे, गणेश गोरे, बापूराव मडके, सुरेश चौधरी, बाळासाहेब पाटेकर, ज्योतिक कारभारी, दिनकर ढाकणे, अशोक पातकळ, दत्तू गाढे, आदिनाथ झिरपे, कृष्णा तेलोरे, बाबुशा मडके, योगेश तेलोरे, प्रल्हाद आंधळे, चांगदेव ढाकणे, बापूराव मडके, श्रीराम मडके, कैलाश गुजर, राजेंद्र ढाकणे आदि उपस्थित होते.

या प्रसंगी कृती समितीचे अध्यक्ष गावडे म्हणाले की शेवगाव तालुक्यातील सुपीक जमीन जायकवाडी धरणामध्ये गेली व शासनाने तिचे नुकसान भरपाई म्हणून ताजनापुर लिफ्ट क्र-1 व ताजनापुर टप्पा क्र-2 या योजना शासकीय खर्चाने मंजूर केल्या. टप्पा क्र-1 कागदोपत्री पूर्ण आहे व वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. टप्पा क्र-2 साठी 395 कोटी 48 लाख इतक्या रकमेची ही योजना आहे. टप्पा 2 साठी 2.2 टी.एम.सी. पाणी शिल्लक आहे. या योजनेवर आत्तापर्यंत शासनाचा 79.20 कोटी इतका खर्च झाला आहे.

तसेच हि योजना सन 2013 पर्यंत पूर्ण करू असे लेखी शासनाने आम्हास दिलेले आहे. मागील वर्षी यावर शासनाने 5 कोटी निधी टाकला त्यामध्ये 1.60 कोटी खर्च होऊन बाकी 3.40 कोटी शिल्लक आहेत व या वर्षासाठी आत्ताच मा. आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन 5.5 कोटी निधी मिळवला आहे. या पैशामध्ये वितरण कुंडापर्यंतचे कामे सुद्धा होऊ शकत नाहीत. त्यासाठी 15 ते 18 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. शासनाने ही योजना एका वर्षात पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा . या संदर्भात गावगावच्या युवकांच्या माध्यमातून जनजागृती व आंदोलन सुरु करणार आहेत असेही श्री गावडे म्हणाले. या प्रसंगी श्री देवराव दारकुंडे, अशोक झिरपे, जालिंदर काळे यांची भाषणे झाली. तर आभार दिनकर ढाकणे यांनी मानले.