Breaking News

श्रीरामपूरात जगविख्यात जादूगार आंचल यांचे प्रयोग सुरु


श्रीरामपूर, शहरातील बुवा संगमनेर रोड वरील बुवा मंगल कार्यालयात आंतरराष्ट्रीय जगविख्यात व लिम्का बुक रेकॉर्ड बुक मध्ये नोंद असलेल्या जादूगार आंचल यांच्या पहिल्या शोचा शुभारंभ सायंकाळी सात वाजता नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या हस्ते झाला. 

यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या मिनाताई जगधने ,नगरसेविका भारती कांबळे, कोपरगावच्या माजी नगराध्यक्षा सुहासिनी ओमप्रकश कोयटे, दीपाली चित्ते, वैशाली चव्हाण , प्रेमचंद कुंकलोळ, आदित्य आदिक, राजेंद्र पवार, भूमाता ब्रिगेड च्या शहर अध्यक्ष अनिता शर्मा, जिल्हा सरचिटणीस शीतल खर्डे , तृप्ती करीर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन गिरिधारी कुमावत, पूनम सावंत यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय खेमनर यांनी केले. आभार प्रदर्शन जादूगार आंचल यांनी केले. यावेळी कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पहिला शो सादर करताना जादूगार आंचल यांनी आपले विविध जादूचे प्रयोग दाखवून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. अतिशय कलात्मक प्रयोग पाहून सर्वच थक्क झाले.