Breaking News

संत निरंकारी मंडळाचे कुकाणा येथे स्वच्छता अभियान


कुकाणा, संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन कुकाणा यांचे वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र कुकाणा येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती . या मध्ये निरंकारी मंडळाचे पुरुष व महिला सेवादल तसेच भक्त मंडळी, ग्रामस्थ , आरोग्य केंद्राचे अधिकारी व सर्व कर्मचारी वर्गाने उपस्थित राहून योगदान दिले . 

प्राथमिक आरोग्य केंद्र परिसर स्वच्छ करण्यात आला . तर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने चहा व अल्पोपहार देण्यात आला. या कार्यक्रमासाठी विठ्ठल खाडे महाराज(संत निरंकारी मंडळ सोनई) , सरपंच छाया कारभारी गोर्डे, माजी सरपंच दौलत देशमुख, एकनाथ कावरे , उपसरपंच भाऊसाहेब फोलाने ,शरद गरड , विशाल निकम , आरोग्य अधिकारी डॉ .शिंदे तसेच संतोष म्हस्के , सेवादल संचालक विनायक होडशीळ आदि मान्यवर उपस्थित होते .

सायंकाळी 7 ते 10 या वेळेत राजकुमार महाराज (श्रीरामपुर) यांचे उपस्थितीत सत्संग- प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाविक भक्तानां मार्गदर्शन करताना राजकुमार महाराज म्हणाले की जो पर्यन्त ब्रह्माच ज्ञान होत नाही तो पर्यन्त भक्तीला प्रारंभ होत नाही त्याकरिता मनुष्याच्या जीवनामध्ये सद् गुरुचीची आवश्यकता आहे.