Breaking News

देवदैठणच्या ग्रामसेवकाने सीईओच्या आदेशाला दाखवली केराची टोपली


ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराला कंटाळून ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे पंचायत समितीच्या कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. देवदैठण येथील ग्रामपंचायत कार्यालयात संगणक परिचालक म्हणून नीता कौठाळे यांची जिल्हा परिषदेच्या टेंडर दिलेल्या सी एस सी कंपनीच्या वतीने नेमणूक झाली होती. त्यामुळे नीता कौठाळे या ग्रामपंचायतीत हजर झाल्या. पण ग्रामसेवक साबळे यांनी जाणीवपूर्वक कोठाळे यांना हजर केलेल्या पत्रावर सही केली नाही. काही दिवसातच कामावरून कमी करण्यात येत असल्याची नोटीस दिली. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या पत्राने पुन्हा ग्रामपंचायतीत हजर होण्यासाठी गेले असता, ग्रामसेवक साबळे यांनी कोठाळे यांना हजर करून घेतले नाही. त्यामुळे नीता कौठाळे यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना ग्रामसेवक साबळे यांनी जाणीवपूर्वक त्रास दिला असल्यामुळे ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात पंचायत समितीच्या कार्यालयासमोर नीता कौठाळे यांनी उपोषण सुरु केले आहे