नगर : येथील माऊली ईको सर्व्हिसेस आणि सामर्थ्य सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एका अभियानाअंतर्गत दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत व घरपोच पॅनकार्ड देण्यात येणार आहे, अशी माहिती प्रा. अमोल खाडे यांनी दिली. ते म्हणाले, मार्च महिन्यात नगरकरांसाठी आर्थिक विषयासंबंधी प्रबोधन व कागदपत्रांच्या बाबतीत सहकार्य करण्याच्या उद्देशाने आर्थिक साक्षरता अभियान आयोजित केले आहे. याअंतर्गत पॅन कार्ड, शॉप अक्ट लायसन, उदयोग आधार, फूड लायसन, पासपोर्ट, इन्कमटॅक्स रिटर्न, गॅझेट (राजपत्र), संस्था नोंदणी, संस्थेचे चेंजिंग व ऑडिट रिपोर्ट, विमा सेवा, विविध कर्ज योजना, रेशन कार्ड संबंधीचे कामे जाणार आहेत. इच्छुकांनी मो. ९१३०८४८८८० या भ्रमणध्वनीवर संपर्क करावा.
दिव्यांग व्यक्तींना मोफत पॅन कार्ड : प्रा. खाडे
Reviewed by Dainik Lokmanthan
on
16:59
Rating: 5