पंचायत समितीत "आओ जाओ घर तुम्हारा "
श्रीगोंदा/ प्रतिनिधी/- श्रीगोंदा पंचायत समितीत आठवड्याच्या पहिल्या दिवशी लघु पाटबंधारे विभागात शुकशुकाट असल्याचे दिसून आले. या कार्यालयातील अधिकारीच गायब असल्यामुळे नागरीकांचे हाल होताना दिसले.
याबाबत अधिक माहिती अशी की , आठवड्याच्या पहिल्या दिवशी नागरिक सरकारी कामानिमित्त पंचायत समितीत येत असतात. पण पंचायत समितीत सध्या अधिकाऱ्यांना आओ जावो घर तुम्हारा अशी सवय लागली आहे. कारण आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कार्यालयात अधिकारी गैरहजर असणे हि चुकीची बाब आहे. कारण जर अधिकारी गैरहजर असेल, तर खेडेगावातून येणाऱ्या नागरिकांना विनाकारण हेलपाटे मारावे लागत आहेत. आज लघु पाटबंधारे विभागातील अधिकारीच गायब होते. या अधिकाऱ्यांचं बाबतीत विचारणा केली. तर समजले दोन जण अहमदनगर येथे गेले आहेत. तर एका अधिकाऱ्याचा नातेवाईक आजारी असल्यामुळे ते आले नाहीत. पण त्यांचा रजेचा अर्ज आहे का ? अशी विचारणा केल्यावर त्यांचा रजेचा अर्ज न आल्याचे समजते. त्यामुळे पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांवर कोणाचा वचकच राहिला नसल्याचे दिसून येते.