अग्रलेख सत्तेचा उन्माद !
त्रिपूरात भाजपाने एकहाती सत्ता मिळविल्यानंतर सोमवारी दोन घटना समोर आल्यात. एक भाजपाकडून खिलाडूवृत्तीचे, उदारता दाखविणारे कृत्य होते, तर दुसरे कृत्य हे त्यांचा उन्माद दाखवणारे होते. त्रिपुरा राज्य म्हटले की 25 वर्षांपासून डाव्यांचा बालेकिल्ला म्हणून हा प्रदेश परिचित आहे. मात्र याच बालेकिल्याला सुरूंग लावत भाजपाने आपली सत्ता आणली, त्यामुळे ऐतिहासिकदृष्टया ही मोठी घटना. मात्र या ऐतिहासिक घटनेनंतर त्रिपुराचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील आघाडीचे उमेदवार बिपलाब देव यांनी मावळते मुख्यमंत्री माणिक सरकार यांच्या पाया पडून त्यांचे आशीवार्द घेतले. हा त्यांच्या वयाचा आणि अनुभवाचा मान असल्याची प्रतिक्रिया देखील देण्यास ते विसरले नाही. त्यांच्या या कृतीतून त्यांची खिलाडूवृत्ती, नम्रपणा, विश्वासार्हता अधोरेखित होत होती. त्यामुळे त्रिपुरातच नव्हे तर संपूर्ण देशात त्यांच्या या कृतीची प्रशंसा झाली नसती, तरच नवल. तर दुसरीकडे याच दिवशी दुपारी काहीसे वेगळे सत्तेचा उन्मादाचे चित्र दिसून आले. रशियन राज्यक्रांतीचा प्रणेता व्लादिमीर लेनिनचा पुतळा दक्षिण त्रिपुरा जिल्ह्यातील बेलोनियामध्ये होता. हा पुतळा भाजपच्या कार्यकर्त्यांनी बुलडोझरच्या मदतीने तोडला. यावेळी ‘भारत माता की जय’च्या घोषणा देत भाजप समर्थकांनी एकच गोंधळ घातला.
एकीकडे भाजपाचे त्रिपुरातील प्रदेशाध्यक्ष आपल्या उदारतचे दर्शन घडवत आहे, तर दुसरीकडे याच प्रदेशाध्यक्षांचे आदेश मानणारे कार्यकर्ते धिंगाणा घालतांना दिसून येत आहे. हे नेमके कशाचे लक्षण आहे. सत्ता मिळविल्यानंतर राज्यात काहीही करण्याचे अधिकार आपल्याला मिळाले, असे संकेत भाजपाकडून प्रदर्शित होत आहे. लेनिनचा पुतळा पाडून ले निनचे विचार संपणार आहे, किंवा डावे संपणार आहे, अशातला कोणताही भाग नाही, पंरतू हे भाजपच्या कार्यकर्त्यांना समजायला हवे. मात्र सत्ता मिळाल्याच्या नादात त्यांनी आपले सर्व नैतिक कर्तव्याला हरताळ फासण्याचे काम करू नये. सत्ता हे परिवर्तनांचे साधन आहे. त्याद्ारे लोकांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडवावा लागणार आहे. डाव्यापेक्षा आपण सरकार आणि प्रशासन उत्तम चालवू असा विश्वास, दिलासा भाजपकडून देणे अपेक्षित आहे. न की आपले सरकार आले म्हणून डाव्यांचा तिरस्कार करण्याची भूमिका, हिंसाचार घडवून आपल्या संकुचित वृत्तीचे प्रदर्शन भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मांडू नये. त्रिपुरा राज्यातील निकालांनतर दुसर्या दिवशीभाजपचे सरकार बनल्यानंतर राज्यभरात जवळपास सर्वच भागात तोडफोड आणि मारहाणीच्या घटना घडत आहेत. भाजप आणि आयपीएफटीचे कार्यकर्ते हिंसा करत असल्याचा आरोप होत आहे. भाजपच्या विजयानंतर त्रिपुरातील विविध भागात सातत्याने हिंसेच्या घटना घडत असल्याचे स्वत: पोलीस अधीक्षकांनीच सांगितले आहे. मात्र, या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिस आपल्या परीने पूर्ण प्रयत्न करत असून, घटनांची संख्या मोठी असल्याने नियंत्रण मिळवण्यात अडथळे येत असल्याचेही पोलीस अधीक्षकांनी सांगितले. दरम्यान, त्रिपुरात निवडणूक जिंकल्यानंतर हिंसेच्या घटना घडणे म्हणजे पंतप्रधां मोदींच्या लोकशाहीवरील विश्वासाच्या दाव्याचा चेष्टा आहे, असे सीपीएमने म्हटले आहे. त्यामुळे त्रिपुरातील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बिपलाब देव यांनी ज्याप्रकारे आपल्या खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवले, त्याचप्रमाणे ते त्रिपुरातील हिंसा आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करतील, तसेच लेनिन चे तोडलेले पुतळे त्याच जागेवर पुन्हा बसवतील का? असे अनेक आव्हाने त्यांच्यासमोर आहे. अन्यथा भाजपच्या सत्तेच्या उन्मादात विकसाचे चित्र कुठेही हरवू नये, हीच अपेक्षा !