Breaking News

इकोफ्रेश कोल्ड स्टोरेजची सेवा सुरू

सोलापूर - अन्नपदार्थ टिकवून ठेवण्यासाठी सोलापुरात इकोफ्रेश कोल्ड स्टोरेज अ‍ॅन्ड वेअर हाऊसिंगची स्थापना करण्यात आली. यात शीतगृहात वजा 20 अंश सेल्सियसपासून ते 15 अंश सेल्सियसपर्यंत तापमान राहणार असल्याची माहिती बिपीन रेवणकर यांनी दिली. सोलापूर येथील एमआयडीसी चिंचोळी येथे हे शीतगृह उभारण्यात आले. यात आईस्क्रीम, लोणी, फळांचे पल्प, फळे , भाज्या, फ्रोझन अन्नपदार्थ, कडधान्ये व डाळी, सुका मेवा, चॉकलेट आदी पदार्थ ठेवले जाणार आहे. अन्न पदार्थांच्या वाहतुकीसाठी 21 रेफ्रिजरेटेड वाहने असल्याचे रेवणकर यांनी सां गितले.