Breaking News

चप्पल विक्रेत्याला लुटल्या प्रकरणी एक अटकेत


सोलापूर  - चाकूचा धाक दाखवून चप्पल विक्रेत्याला लुटल्या प्रकरणातील चारपैकी एकाला पकडण्यात पोलिसांना यश आले. त्या संशयितास प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी चार दिवसांची पोलिस कोठडी दिली. ही घटना सावडी येथे घडली होती. रूपेश गोविंद काळे (वय 24, रा. पवार वस्ती, राशीन जि. अहमदनगर) असे कोठडी मिळालेल्या संशयिताचे नाव आहे. बिब्या कुड्या काळे, रूपाली बिब्या काळे, छाया खत्या पवार हे अन्य संशयित गायब आहेत. याप्रकरणी महमद अफजाल उम्मेद अलीराव (वय 22, रा. सोनाता, जि. शामली, उत्तरप्रदेश, हल्ली रा. कृ ष्णाजीनगर, करमाळा) यांनी फिर्याद दिली. महम्मद हा ठोक चप्पल विक्रेता आहे. तो गावोगावी फिरुन चप्पल विक्री करतो. तो राशीन येथे गेल्यावर संशयित छाया पवार हिने त्याला 100 चप्पल जोड खरेदी करायचे असल्याचे सांगून बोलवले. त्याला सावडी येथे नेले. तेथे संशयितांनी पैशाऐवजी कमी पैशात सोने घेण्यास सांगितले. त्याने नकार दिल्याने चाकुचा धाक दाखवून दहा हजार रुपये, मोबाइल लुटून नेले.